"ठाकरे सरकार डरती है, पुलीस को आगे करती है"; भाजपच्या वतीने नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:24 PM2022-01-24T17:24:56+5:302022-01-24T17:25:02+5:30

यावेळी घोषणा बाजी चालू असताना काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडीत कार्यकर्त्यांना अटक केली.

BJP workers agitation against Thackeray government and Nana Patole in Palghar | "ठाकरे सरकार डरती है, पुलीस को आगे करती है"; भाजपच्या वतीने नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी

"ठाकरे सरकार डरती है, पुलीस को आगे करती है"; भाजपच्या वतीने नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी

Next

पालघर- ''ठाकरे सरकार डरती है, पुलीस को आगे करती है, नाना पटोले हाय हाय अशा घोषणा देत भाजपच्या वतीने पालघरच्या हुतात्मा स्तंभा जवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या प्रयत्नादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्या मध्ये जोरदार खेचाखेची झाली.

नाशिक येथे एका कार्यक्रमात ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात  असले बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्हा भाजपच्या वतीने पालघर भाजप कार्यालय ते हुतात्मा स्तंभा पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस सुजित पाटील,युवाध्यक्ष समीर पाटील होते. यावेळी नाना पटोले आणि ठाकरे सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

आपल्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य केल्याचा निषेध करताना भाजप पदाधिकाऱ्यांची जीभ ही घसरल्याने ''निम का पत्ता कडवा है नाना पटोले .....है,''इतकी गर्दी कश्यासाठी नाना पटोलेच्या मैता साठी''अश्या घोषणा देण्यात आल्याचे पहावयास मिळाले. बोलले ते झाकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले एका पाठोपाठ खोटे बोलत असून आमच्या पंतप्रधानांचे चारित्र्य हनन यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे सांगून असेच वक्तव्य सुरू राहील्यास तुमच्या घरावर धडक मारू असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पटोले यांना दिला. यावेळी घोषणा बाजी चालू असताना काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडीत कार्यकर्त्यांना अटक केली.

Web Title: BJP workers agitation against Thackeray government and Nana Patole in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.