Marathi News : मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर रितू तावडे यांनी सुरू केली आहे. मात्र, हे पाहणीदौरे करताना महापौर आम्हाला किंवा स्थानिक नगरसेवकांना माहिती देत नाहीत, अशी नाराजी उपमहापौर संजय घाडी आणि शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी गुरुवारी बोलून दाखविली. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेत धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वृद्ध, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आघाडीवर
गेले काही दिवसांपासून तावडे यांनी मुंबईच्या विविध भागांत नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. मित्रपक्ष म्हणून आम्हाला किंवा स्थानिक नगरसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. शुक्रवारच्या दौऱ्यासाठीही महापौरांकडून कोणतीही माहिती किंवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही, अशी खंत शिंदेसेनेने व्यक्त केली.
नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी भाजप शुक्रवारपासून दौरा सुरू करीत आहे. त्यात पश्चिम उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित असतील, अशी महिती सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.
भाजपचे अनेक नगरसेवकही नालेसफाईची पाहणी करून आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दरवर्षी नालेसफाई किती होते, आकडे किती फुगवून सांगितले जातात, प्रत्यक्षात नालेसफाईतून किती गाळ निघतो, या सगळ्यांची पोलखोल यंदा होईल. भ्रष्टाचाराची साखळी आम्हाला तोडायची असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
थर्माकोल, प्लास्टिक, फर्निचरचा खच
कुर्ला परिसरातील पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, प्लास्टिकच्या पिशव्या, फर्निचर आणि इतर कचरा आढळून आला.
नाल्यात कचरा न टाकण्याबाबत जनजागृतीसाठी स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याचेही उपमहापौर घाडी यांनी सांगितले.
Web Summary : BJP and Shinde Sena clash over drain cleaning inspections. Shinde Sena alleges Mayor Tawade doesn't inform them or local corporators. BJP plans separate inspections, highlighting potential corruption in drain cleaning processes. Large amounts of trash found in drains.
Web Summary : नाले की सफाई निरीक्षण पर भाजपा और शिंदे सेना में विवाद। शिंदे सेना का आरोप है कि महापौर तावडे उन्हें सूचित नहीं करती हैं। भाजपा ने अलग निरीक्षण की योजना बनाई, जिसमें नाले की सफाई में भ्रष्टाचार उजागर करने की बात कही गई। नालों में कचरा मिला।