भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:23 IST2025-11-27T15:19:30+5:302025-11-27T15:23:26+5:30
महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे या मागणीसाठी अनेक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती.यानंतर मुंबई दुकान आस्थापनाने मुंबईतील दुकाने आणि कार्यालये यावरील पाटी किंवा नाव फलक हा मराठीमध्ये करण्याचे अनिवार्य करण्यात आले होते.

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसात जाहीर होणार आहे. या निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, मराठी मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीने भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे या मागणीसाठी अनेक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती.यानंतर मुंबई दुकान आस्थापनाने मुंबईतील दुकाने आणि कार्यालये यावरील पाटी किंवा नाव फलक हा मराठीमध्ये करण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावरील बोर्डवर इंग्रजीमध्ये फलक असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता मराठी एकीकरण समितीने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेकड तक्रार दिली आहे.
मराठी फलक लावले नसल्यास मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र आता सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयावरील पाटी महापालिकेला दिसत नाही का? अशा चर्चा सुरू आहेत. यावरुन आता नवीन वाद सुरू आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी -हिंदी भाषेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे.