Join us  

मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 5:45 PM

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत. उदयनराजे यांच्या या भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. 

उदयनराजे भोसले यांनी याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. यासोबतच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते. त्यानंतर आज उदयनराजे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. आज संयकाळी ५ वाजता उदयनराजे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह 'कृष्णकुंज'वर पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे, उदयनराजे यांची कृष्णकुंजवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याशी भेट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे. राज यांच्या भेटीनंतर उदयनराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे राज यांच्या भेटीनंतर उदयनराजे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

टॅग्स :उदयनराजे भोसलेराज ठाकरेमनसेमराठा आरक्षणभाजपा