भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 20:35 IST2018-03-29T20:35:09+5:302018-03-29T20:35:09+5:30

भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केली आहे. अमित साटम कनिष्ठ अभियंत्यांशी अश्लील भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

BJP MLA of the party's municipal engineer Shabby | भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

मुंबईः भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केली आहे. अमित साटम कनिष्ठ अभियंत्यांशी अश्लील भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. साटम यांनी कनिष्ठ अभियंत्याला दमदाटी करतानाच कार्यकारी अभियंता पवार यांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय.

के पश्चिम वॉर्डात राठोड (कनिष्ठ अभियंता), तर पवार (सहाय्यक अभियंता) यांना म्हणून कार्यरत आहेत. त्याच मतदारसंघाचे अमित साटम हे भाजपाकडून आमदार आहेत. एका बांधकामाच्या प्रस्तावावरून साटम आणि पवार यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातूनच साटम यांनी राठोड आणि पवारांना शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पवार फोन उचलत नसल्याचंही साटम म्हणाले आहेत. 

परंतु एका वृत्तवाहिनीकडे साटम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पवार यांनी के पश्चिम वॉर्ड सोडून दहा महिने झाले आहेत. हे संभाषण किमान एक वर्ष जुन असल्याचं मला वाटतंय. अशा प्रकारचं कोणतंही संभाषण झाल्याचं माझ्या लक्षात नाही, असं अमित साटम म्हणाले आहेत. तसेच अभियंते पवार यांच्याशी माझे चांगले हितसंबंध आहेत. त्यामुळे त्यांना मी शिवीगाळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विधानसभेत मी 50 हजार कोटींचा घोटाळा उघड केला होता. त्यावर लोकायुक्तांतर्फे सुनावणी सुरू आहे. माझी बदनामी करण्याचं षड्यंत्र असल्याचाही आरोप साटम यांनी केला आहे.  

Web Title: BJP MLA of the party's municipal engineer Shabby