Join us

भाजप आमदार किसन कथोरेंनी केले आदिवासी नृत्य

By पंकज पाटील | Updated: April 6, 2023 19:46 IST

मुरबाडच्या मोहवाडीत आदिवासी महिलांसोबत धरला ठेका

बदलापूर : भाजप आमदार किसज कथोरे यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य केले. भाजप स्थापना दिनानिमित्त मुरबाडच्या मोहवाडीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कथोरेंनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

      भाजप स्थापना दिनानिमित्त मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी ग्रामीण भागातील मोहवाडी गावात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. मुरबाड हा आदिवासीबहुल तालुका असल्याने कार्यक्रमाला आदिवासी महिलांनीही मोठी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरताच आमदार किसन कथोरे हेदेखील त्यांच्यात सहभागी झाले आणि आदिवासी नृत्याचा आनंद घेतला. 

टॅग्स :बदलापूरभाजपाआमदार