Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mohit Kamboj: मोहित कंबोज यांना‌ पोलीस संरक्षण द्या; भाजपाच्या ७ आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:54 IST

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसंच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करत चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या मोहित कंबोज यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी भाजपा आमदारांनी केली आहे.

मुंबई-

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसंच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करत चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या मोहित कंबोज यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी भाजपा आमदारांनी केली आहे. "मोहित कंबोज भारतीय हे गेले काही दिवस सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना २०२० साली पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पण ते अचानक काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने आपण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीनं त्यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत", अशी मागणी भाजपाच्यावतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

आतापर्यंत भाजपाच्या सात आमदारांनी मोहित कंबोज यांना पोलीस संरक्षण देण्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यात भाजपा आमदार अतुल भातखळकर, प्रसाद लाड, अमित साटम, मनिषा चौधरी, सचिन कल्याणशेट्टी, कॅप्टन आर. तमिल सेल्वन आणि राम विठ्ठल सातपुते यांचा समावेश आहे.  

टॅग्स :भाजपासंजय राऊतअतुल भातखळकर