Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही तेव्हा धोक्यात आली नव्हती का?; आशिष शेलार अन् भास्कर जाधव यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:44 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भास्कर जाधव यांच्या विधानावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळी भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या सभागृहात जुंपल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोनानंतर संसदेचे कामकाज झाले, पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज होत नव्हते, लक्षवेधी होत नव्हत्या, प्रश्न उत्तरे होत नव्हती, विधेयकांवर चर्चा होत नव्हती, आमदारांना प्रश्न विचारता येत नव्हते, मग त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती का? असा थेट सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला. आज लोकशाही धोक्यात आली असा आरोप करणाऱ्या भास्कर जाधव यांना  उद्देशून बोलताना ते म्हणाले की, भास्कर जाधव यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाली आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

मुंबई महापालिका वगळून राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांची प्रभाग रचना चार सदस्यीय करणारा कायदा म्हणजे  देशाच्या "वन नेशन वन इलेक्शन" या संकल्पनेसह नगर राज बिलाला बढावा देणाराच आहे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मांडली. मुंबई महापालिका वगळून राज्यातील नगरपालिका महानगरपालिकांची प्रभाग रचना चार सदस्यीय करणारा कायदा म्हणजे  देशाच्या  "वन नेशन वन इलेक्शन" या संकल्पनेसह नगर राज बिलाला बढावा देणाराच आहे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक लोकप्रतिनिधींना संधी देण्याची गरज आहे, जनमानसाच्या सेवेसाठी अधिक लोकप्रतिनिधी असावे, असे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे आजपर्यंत तीन सदस्य प्रभाग समिती होती त्यामध्ये एक सदस्याची वाढ करून ती चार सदस्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, हा लोकशाहीला बळकटी देणाराच आहे, असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :आशीष शेलारभास्कर जाधवमहाराष्ट्र बजेट 2024