Join us

भाजपच्या नेत्यांना जडलाय निद्रानाश, जयंत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 07:18 IST

२२ मे पासून भाजपचे राज्यव्यापी ‘महाराष्टÑ बचाव’ आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मंत्री पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली.

मुंबई : सत्ता गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते कमालीचे अस्वस्थ असून अनेकांना निद्रानाश जडला आहे. राज्यावर कोरोना महामारीचे संकट असताना ते सत्ता हस्तगत करण्याचे दिवास्वप्न पहात आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर शरसंधान साधले.२२ मे पासून भाजपचे राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मंत्री पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असून कोरोनाच्या संकटात विरोधकांनी राजकारण न करता सरकारला सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. १० जून रोजी राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियान आयोजित केले आहे.

टॅग्स :जयंत पाटीलभाजपा