Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 22:06 IST

यासंदर्भात स्वतः विनोद तावडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया श्रीधर तावडे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. यासंदर्भात स्वतः विनोद तावडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 

विजया तावडे यांच्यावर मंगळवारी सकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. "आपल्याला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, माझी आई विजया श्रीधर तावडे यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले," असे ट्विट तावडे यांनी केले आहे.  

विनोद तावडे यांनी निवडणुकांच्या काळात विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे. नुकतेच त्यांच्याकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीतही ते आहे. 

टॅग्स :विनोद तावडेभाजपामुंबई