भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका; लीलावती रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 19:21 IST2023-09-26T19:20:04+5:302023-09-26T19:21:05+5:30
Shahnawaz Hussain Heart Attack: मंगळवारी सायंकाळी हुसेन यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांना तातडीने लीलावतीमध्ये नेण्यात आले.

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका; लीलावती रुग्णालयात दाखल
भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"हृदयविकाराचा झटका आल्याने शाहनवाज हुसेन यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. अँजिओप्लास्टी करण्यात आली," असे लीलावती रुग्णालयाचे जलील पारकर यांनी सांगितले.
आज, मंगळवारी सायंकाळी हुसेन यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांना तातडीने लीलावतीमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने हुसेन यांची अँजिओप्लास्टी केली आहे.