Join us  

'अजून खूप काही बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका'; राणेंचा शिवसेनेवर हल्ला

By मुकेश चव्हाण | Published: October 05, 2020 3:29 PM

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) च्या न्यायवैद्यक विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) दिलेल्या अहवालात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती समोर आली. या अहवालातून सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिांना बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर आम्ही निशब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असलेल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा अहवाल आहे. त्यांचे शिवसेना व अन्य कोणत्या राजकीय पक्षाशी कोणतेही संबंध नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच एम्सच्या अहवालानंतर शिवसेना देखील पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मात्र याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी AIIMSच्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली. त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका, असं म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर हल्ला केला आहे.

तत्पूर्वी, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे, ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनीही भाजपा नेत्यांवर केली टीका-

सुशांतसिंग प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. सुशांतसिंगची हत्या नसून आत्महत्या आहे असं एम्सने सीबीआयला रिपोर्ट दिल्याचं सांगितलं गेलं, त्यानंतर सत्ताधारी नेते आक्रमक झाले, याप्रकरणी आमदार रोहित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.

आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं तर  बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फिरलंय, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असं रोहित पवार म्हणाले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपानिलेश राणे महाराष्ट्र सरकारगुन्हा अन्वेषण विभाग