"लोकांनी आडवं करायचं ठरवलं मग आडनाव बॅनर्जी असो किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच"

By मुकेश चव्हाण | Published: December 20, 2020 01:32 PM2020-12-20T13:32:30+5:302020-12-20T13:50:54+5:30

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे. 

BJP leader Nilesh Rane has criticized the maharashtra vikas aghadi government | "लोकांनी आडवं करायचं ठरवलं मग आडनाव बॅनर्जी असो किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच"

"लोकांनी आडवं करायचं ठरवलं मग आडनाव बॅनर्जी असो किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच"

Next

कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण ताकद, यंत्रणा पणाला लावली जात आहे. तर भाजपाच्या काही चेहऱ्यांनी या निवडणुकीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेत आहेत. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे. 

निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सभा. एकदा लोकांनी कोणाला आडवं करायचं ठरवलं मग आडनाव बॅनर्जी असो किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. तसेच अति तिथे माती होणारचं, असं म्हणत निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम गालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ मे २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. 

Web Title: BJP leader Nilesh Rane has criticized the maharashtra vikas aghadi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.