Join us

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 15:47 IST

सचिन सावंत यांच्या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मुंबई: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवे वळण येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही तापले आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये ड्रग्जबाबतीत माहितीनंतर एनसीबीने रियासह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप काही व्हॉट्सअॅपवरील चॅटवरून समोर आले आहे. याचदरम्यान सुशांत सिंग राजपूत प्रकरणाकडे भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे, असं म्हणत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं होतं. सचिन सावंत यांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, काँग्रेसचे नेते सचिन सावंत सांगत आहे की संदीप सिंग भाजपाच्या जवळ होता. पण त्यांना एवढं कळत नाही, मुंबई पोलीस ७० दिवस सीबीआय चौकशीची वाट बघत होती का? तसेच निलेश राणे यांनी एक फोटो शेअर केला असून त्या फोटमधील लोकांना देखील केसमध्ये घ्या, असं सांगितले. त्याचप्रमाणे सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या किंवा उभं राहायचं धाडस दाखवा, असं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी मला बर्‍याच विनंत्या व तक्रारी आल्या आहेत, त्यानंतर मी बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्याच्या संबंधाबद्दल तपासासाठी सीबीआयकडे त्या तक्रारी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे संदीप सिंगच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या- 

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

टॅग्स :सचिन सावंतनिलेश राणे भाजपाकाँग्रेससुशांत सिंग रजपूत