Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार; नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:16 IST

किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई- मी उद्या दिनांक १५ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. तसेच, काही दिवस मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर उद्या देणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं. 

मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा किरीट सोमय्यांनी यावेळी केला. तसेच घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

आयएनएस विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. तसेच, यातील मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या असल्याचा दावाही संजय राऊतांकडून केला जात आहे. याप्रकरणी देखील किरीट सोमय्यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, अशी माहिती सोमय्यांनी दिली.  

1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे.  संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात, असंही सोमय्यांनी यावेळी सांगितलं.  

नेमकं प्रकरण काय आहे? 

'INS विक्रांत' ही युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून 58 कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केले, असा आरोप शिवसेन नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :किरीट सोमय्यामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे