'श्रीमान स्वप्नवीस'; देवेंद्र फडणवीसांना व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 21:57 IST2021-10-12T21:55:51+5:302021-10-12T21:57:07+5:30
क्लाईड क्रास्टो हे नेहमीच वेगवेगळ्या विषयावर भाजपवर आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून हल्लाबोल करत असतात.

'श्रीमान स्वप्नवीस'; देवेंद्र फडणवीसांना व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी फटकारले
मुंबई: 'श्रीमान स्वप्नवीस... मी आजही मुख्यमंत्री' अशा शब्दात आपल्या कुंचल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.
मला आजही असं वाटतं मी मुख्यमंत्री आहे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्यावर व्यंगचित्राच्या कुंचल्यातून क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'श्रीमान स्वप्नवीस' ही पदवी दिली आहे.
मी आजही मुख्यमंत्री
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) October 12, 2021
~ श्रीमान स्वप्नवीस #DevendraFadnavispic.twitter.com/yvQDcO2oy1
क्लाईड क्रास्टो हे नेहमीच वेगवेगळ्या विषयावर भाजपवर आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून हल्लाबोल करत असतात. आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नावर पुन्हा एकदा क्लाईड क्रास्टो यांनी बोट ठेवत चिमटा काढला आहे.