Join us  

...म्हणून सोनू सूदला भाजपाशी जोडल्याचा आनंद; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 7:10 PM

सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर हा वाद शमेल अशी शक्यता होती, पण याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला

ठळक मुद्देसोनू सूदने स्वत:च्या हिमतीने काम केलं, त्यांचं कौतुक केलंसोनू सूदला भाजपशी जोडलं, आम्हाला आनंद आहेशिवसेनेला माहित आहे, चांगली काम भाजपच करते

मुंबई – अभिनेता सोनू सूद यांच्यावर सामनातून टीका केल्यानंतर राज्यात भाजपा शिवसेना पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. सोनू सूदलाभाजपाने दत्तक घेतलं असावं, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय सोनू सूदने इतकं मोठं कार्य केलं यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, तो उत्तम अभिनेता आहे, लवकरच त्याचा राजकीय चित्रपट कोणता याचा खुलासा होईल असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या माध्यमातून भाजपावरही टीकेचे बाण सोडले.

रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सोनू सूद प्रकरण ताजं असताना रात्री उशिरा सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर हा वाद शमेल अशी शक्यता होती, पण याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. सोनू सूदने स्वत:च्या हिमतीने काम केलं, त्यांचं कौतुक केलं, त्यांना भाजपशी जोडलं, आम्हाला आनंद आहे, शिवसेनेला माहित आहे, चांगली काम भाजपच करते, मात्र अशा बाबतीत राजकारण चुकीचं असं सांगत फडणवीसांना शिवसेनेला टोला लगावला.

तसेच आमचं सरकार होतं त्यावेळी जलयुक्त शिवारचं काम करत होतो, तेव्हा नाम, अभिनेता अमिर खानची पाणी फाऊंडेशन मदत करायचे, आम्ही हेवेदावे केले नाहीत. ते सरकारची मदतच करत होते. त्यांचे आम्ही कौतुकच केले, जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं सांगत संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

संजय राऊतांनी केली होती टीका

एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय? भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे.

सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे. पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही असं ते म्हणाले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...तर २०२१ पर्यंत चीनला १ लाख कोटींचा फटका देणार; भारतीय व्यापारी संघटनेचा आक्रमक पवित्रा

चीनची भारताला धमकी; आम्हाला फरक नाही, चीनी सामानावर बहिष्कार आणण्याचं दूरच पण...

मनसे आमदाराचा राज्य सरकारला जाब; ‘या’ प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं अन् आजही नाही

Video: जन्माच्या २० मिनिटांनंतर डान्स करतोय हत्तीचा पिल्लू; व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव!

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपासोनू सूदमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस