Join us

Chitra Wagh: आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 16:44 IST

Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation: अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात हायकोर्टानं आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)

"संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्...", फडणवीसांनी लगावला टोला

"राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?", असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. 

"मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही, मी बोलणं योग्य नाही", कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामापरमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

जनतेच्या मनातलं सरकार नाही- फडणवीस"हायकोर्टानं दिलेल्या निकालानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासण्याचं काम केलं आहे", असा जोरदार घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

 

टॅग्स :चित्रा वाघअनिल देशमुखपरम बीर सिंगराष्ट्रवादी काँग्रेस