Join us  

महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 1:03 PM

शरद पवारांच्या या विधानावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं. त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला होता. शरद पवारांच्या या विधानावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

'राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनचीही चिंता वाढेल असं वाटत नाही'; शरद पवारांचा दावा

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. 

सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपाविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत मी मे महिन्यात हे सरकार पाडलं जाईल असं ऐकलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याची मुदत देण्यात आली. आता ऑक्टोबरची मुदत दिली जाते आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेकदा वादविवाद रंगत असतात. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या बाजूने समोरच्याला उत्तर देतात. आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचं भान राखत आक्रमक पद्धतीने काम करावं, टीकेला जशास तसे उत्तर द्यावं असे आदेश देखील चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलशरद पवारमहाराष्ट्र विकास आघाडीभाजपामहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेस