Join us

'...त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे'; अतुल भातखळकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:45 IST

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना टोला लगावला आहे.

मुंबई- राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजून केला जातोय. मात्र याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडली. नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचंही पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले की, गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हा आरोप केला जातोय. मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक यापद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही असा टोलाही पवारांनी भाजपाचं नाव न घेता लगावला. शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपाने देखील त्यांना प्रतिटोला लगावला आहे. 

पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात.....त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे, असा टोला भाजपाचे नेते अतुल भातखळर यांनी लगावला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढा असा आग्रह भाजपा करतेय. परंतु त्यांना अटक झाली म्हणून का काढा?  कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केलं जात आहे. 

टॅग्स :शरद पवारअतुल भातखळकरराष्ट्रवादी काँग्रेसभाजपानवाब मलिक