भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर, नव्या चेहऱ्यांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:15 IST2025-05-14T08:15:03+5:302025-05-14T08:15:03+5:30

स्थानिक आमदार, खासदार, नेत्यांमध्ये वाद असल्याने काही ठिकाणी ही निवड रखडल्याचे म्हटले जाते.

bjp district president announced new faces given opportunity | भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर, नव्या चेहऱ्यांना दिली संधी

भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर, नव्या चेहऱ्यांना दिली संधी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्यांना संधी देण्यात आल्याचे या नियुक्त्यांवरून पाहायला मिळत आहे. आता लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षांची नितर केली जाणार आहे.

भाजपचे संघटनात्मकदृष्ट्या राज्यात ७८ जिल्हे असून २० जिल्हाध्यक्षांची निवड अद्याप बाकी आहे. स्थानिक आमदार, खासदार, नेत्यांमध्ये वाद असल्याने काही ठिकाणी ही निवड रखडल्याचे म्हटले जाते.

मुंबई : उत्तर मुंबई-दीपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबई-दीपक दळवी, उत्तर-मध्य मुंबई- वीरेंद्र म्हात्रे.

कोकण : सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तर-सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिण-राजेश सावंत, रायगड उत्तर-अविनाश कोळी, रायगड दक्षिण-धैर्यशील पाखील, ठाणे शहर संदीप लेले, ठाणे ग्रामीण-जितेंद्र डाकी, भिवंडी-रविकांत सावंत, मीरा भाईंदर दिलीप जैन, नवी मुंबई- डॉ. राजेश पाटील, कल्याण-नंदू परब, उल्हासनगर-राजेश वधारिया.

पश्चिम महाराष्ट्र : पुणे शहर-धीरज घाटे, पुणे उत्तर (मावळ)-प्रदीप कंद, पिंपरी चिंचवड शहर-शत्रुघ्न काटे, सोलापूर शहर-रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्व-शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिम-चेतनसिंग केदार, सातारा- अतुल भोसले, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) -राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम (करवीर)-नाथाजी पाटील, सांगली शहर-प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण-सम्राट महाडिक.

उत्तर महाराष्ट्र : नंदुरबार - नीलेश माळी, धुळे शहर- गजेंद्र अंपाळकर, धुळे ग्रामीण-बापू खलाने, मालेगाव-नीलेश कचवे, जळगाव शहर - दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्व-चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम-राधेश्याम चौधरी, अहिल्यानगर उत्तर-नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिण-दिलीप भालसिंग.

मराठवाडा : नांदेड महानगर - अमर राजूरकर, परभणी महानगर-शिवाजी भरोसे, हिंगोली- गजानन घुगे, जालना महानगर-भास्करराव दानवे, जालना ग्रामीण-आ. नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर उत्तर-सुभाष शिरसाठ, छत्रपती संभाजीनगर पश्चिम-संजय खंबायते, धाराशिव-दत्ता कुलकर्णी.
 

Web Title: bjp district president announced new faces given opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.