Join us

लोकेच्छेविरुद्ध जाण्याचे परिणाम कर्नाटकात दिसले: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 06:02 IST

जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात.

मुंबई : कर्नाटकात काँग्रेस-जेडीयू असे दोन पक्ष एकत्र येऊन लोकेच्छेविरुद्ध अस्तित्वात आलेले सरकार कोसळून स्थापन झालेले बी.एस. येडियुरप्पा सरकारबरोबरच जनमत होते हे आजच्या पोटनिवडणूक निकालात भाजपच्या सरशीवरून दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला त्यांनी एक प्रकारे चिमटा काढला.

फडणवीस म्हणाले, जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात. जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात. त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकवते याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने घालून दिले आहे. जनादेश आणि जनतेच्या इच्छेविरुद्ध जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दिसले.

भाजप कार्यालयात जल्लोष

कर्नाटकच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठे यश आल्याचा जल्लोष येथील प्रदेश भाजप कार्यालयात सोमवारी करण्यात आला. जनता कोणासोबत आहे हे आजच्या निकालाने दिसले, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपा