भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 03:18 IST2020-12-08T03:18:34+5:302020-12-08T03:18:59+5:30

Surekha Patil : कांदिवलीतील भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या विरोधात समतानगर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

BJP corporator Surekha Patil arrested | भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

 मुंबई : कांदिवलीतील भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या विरोधात समतानगर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फेसबुक तसेच व्हाॅट्सॲपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवमानकारक प्रतिमा अपलोड केल्याचा त्यांच्यावर आराेप आहे.  दरम्यान, पाटील यांनी ही पोस्ट डिलीट करून जाहीर माफी मागितली. 
पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमेकडील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला अभिवादन केले. या प्रतिमेवर आक्षेपार्ह खुणा असलेला फोटो त्यांनी फेसबुकवर अपलोड केला. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर अनावधानाने काही खुणा दाखविल्याबाबत मी माफी मागते. इतक्या महान महापुरुषाचा अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, अशा भाषेत फेसबुकवरून पाटील यांनी सर्वांची माफी मागितली.

Web Title: BJP corporator Surekha Patil arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.