सुषमा स्वराज यांच्या निधनाचे भाजपा नगरसेवकाला सोयरसुतक नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:39 AM2019-08-08T01:39:55+5:302019-08-08T06:44:26+5:30

भगवती हॉस्पिटलच्या पुनर्निर्माणाचे केले भूमिपूजन; नगरसेवक म्हणतात, ‘जिसको जो कहना है वह कहने दो...’

BJP corporation not susceptible to death of Sushma Swaraj! | सुषमा स्वराज यांच्या निधनाचे भाजपा नगरसेवकाला सोयरसुतक नाही!

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे भाजपा नगरसेवकाला सोयरसुतक नाही!

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : सुषमा स्वराज यांच्या निधनाचे आर उत्तर वॉर्डमधील प्रभाग क्रमांक ८ चे भाजप नगरसेवक हरीश छेडा यांना सोयरसुतक नाही. छेडा यांनी गेली ६ वर्षे नवनिर्माणच्या प्रतीक्षेत असलेल्या बोरीवली पश्चिम येथील भगवती हॉस्पिटलचे भूमिपूजन केले. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे देशात दु:खवटा असताना, छेडा यांनी उद्घाटन करण्याच्या वृत्तीचा मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव, प्रवक्ता धनंजय जुन्नरकर यांनी निषेध केला आहे. दरम्यान, या प्रकरणी छेडा म्हणाले, ‘जिस को जो कहना है वह कहने दो. आप मेरे ऑफिस में आना. फिर बात करेंगे.’

मुंबई महानगरपालिकेचे बोरीवली पश्चिम येथील भगवती हॉस्पिटल गेल्या ६ वर्षांपासून नवनिर्माणची वाट पाहत आहे. अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर याबाबत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेणार होत्या. भगवती हॉस्पिटलच्या पुनर्निर्माणचे टेंडर निघाले का? भगवती हॉस्पिटल पुनर्निर्मितीसाठी ५ वेळा निविदा मागवून पुन्हा रद्द केल्या गेल्या आणि आज अचानक असे भूमिपूजन करणे योग्य आहे का? असा सवाल जुन्नरकर यांनी केला. भगवती रुग्णालय प्रशासनाने २०१३ला घाईघाईत अतिदक्षता विभागातील रुग्णांसकट सगळ्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टर आणि कर्मचारीदेखील तेथे स्थलांतरित केले होते. आज ६ वर्षे झाली असून, २०१९ आले तरी भगवती हॉस्पिटलची एक वीट रचली नाही. सुषमा स्वराज यांचे निधन झाले असताना आणि अजून त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले नसताना, त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक भगवती रुग्णालयाचे उद्घाटन करत आहे, हे ऐकल्यावर प्रचंड धक्का बसला, असेही जुन्नरकर म्हणाले.

या प्रकरणी नगरसेवक हरीश छेडा यांच्याशी दुपारी दोन वेळा संपर्क साधला असता, ते भूमिपूजनच्या पूजेत आहेत. ५ मिनिटांनी फोन करा, असे त्यांच्या सहायकांनी सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास छेडा यांच्याशी संपर्क झाला.

आर उत्तरच्या सहायक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, भगवती हॉस्पिटलच्या नवनिर्माणचे कंत्राट देण्यात आले आहे. काम लवकर सुरू करायचे असल्याने त्याने पूजा केली. त्यामुळे आपण तिकडे गेलो होतो. मात्र, कंत्राटदाराचे नाव काय आहे, असे विचारले असता, त्याचे नाव माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: BJP corporation not susceptible to death of Sushma Swaraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.