K Annamalai vs Raj Thackeray, Mumbai Bmc Election 2026: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर आल्या आहेत. प्रचाराचा वेग प्रचंड वाढला असून, राज्यासह राज्याबाहेरील बडे नेतेदेखील उमेदवारांच्या प्रचाराला हातभार लावताना दिसत आहेत. भाजपचे तामिळनाडू मधील नेते के अनामलाई यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत येऊन भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यावेळी बोलताना, अनामलाई यांनी मुंबईबाबत बोलताना Bombay is not Maharashtra City असा उल्लेख केला होता. त्यावरून रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याच मुद्द्यावर अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, असेही अनामलाई म्हणाले.
मी धमक्यांना घाबरत नाही, पुन्हा मुंबईत येणार...
"मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं लिहिलं आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार आहे.. माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?" अशा शब्दांत अनामलाई यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले.
अनामलाई मुंबईत काय म्हणाले होते?
भाजपा नेते के. अनामलाई या मुलाखतीत म्हणाले होते, "इथल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे. जर तुम्ही चेन्नई पाहिले तिथे डिएमके आहे आणि टॉपला भाजपा, बंगळुरू काँग्रेस, भाजपा आणि हैदराबाद येथेही काँग्रेस भाजपा असं आहे. मात्र मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी आहे ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट ८ हजार कोटी आहे. बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील."
Web Summary : Annamalai countered Raj Thackeray's criticism, asserting Mumbai is an international city, not limited to Maharashtra. He dismissed threats, affirmed his Mumbai visit, and defended his statement, emphasizing it doesn't diminish Maharashtra's role in building Mumbai.
Web Summary : अन्नामलाई ने राज ठाकरे की आलोचना का जवाब देते हुए कहा कि मुंबई एक अंतर्राष्ट्रीय शहर है, जो महाराष्ट्र तक सीमित नहीं है। उन्होंने धमकियों को खारिज किया, मुंबई की अपनी यात्रा की पुष्टि की और अपने बयान का बचाव करते हुए कहा कि इससे मुंबई के निर्माण में महाराष्ट्र की भूमिका कम नहीं होती है।