Join us

पक्षी सप्ताह : ऑनलाईन पक्षी प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 16:45 IST

Bird Week : पक्षांबद्दल जनजागृती

मुंबई : धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात आढळून येणाऱ्या काही पक्ष्यांचे पक्षी सप्ताह निमित्त ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांमध्ये पक्षांबद्दल जनजागृती निर्माण करता येईल. शासनाने मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व डॉ. सलीम  यांच्या जयंतीचे औचित्त साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी दरवर्षी पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यास या वर्षी मान्यता दिली आहे.

ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शनासाठी राहुल वकारे, विवेक जोशी, धनंजय राऊळ, सचिन राणे, प्रशांत गोकरणकर, तुषार भोईर, सुनीलकुमार गुप्ता आणि युवराज पाटील या छायाचित्रकारांनी छायाचित्र दिली आहेत. हे ऑनलाईन पक्षी प्रदर्शन  उद्यानाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtranaturepark.org  वर पाहता येईल, असे महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

या व्यतिरिक्त पक्षी सप्ताह निमित्त निमित्त निसर्ग भ्रमंती ग्रुपने पक्षी सप्ताहचे  औचित्त साधून त्यांच्या फेसबुक पेज निसर्ग भ्रमंतीवर सर्वसामान्य आढळून येणाऱ्या पक्षांचे छायाचित्र, त्यांचे मराठी नाव, इंग्रजी नाव आणि त्यांचा आकार या बाबत माहिती  दिली  आहे. जेणेकरून पक्षांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचेल व पक्षी संवर्धनामध्ये सर्वांचे हातभार लागतील, असे  सचिन भालेकर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :पक्षी अभयारण्यमुंबईपर्यावरणहवामान