सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; बंगालमधून महिलेला अटक, जाणून घ्या आरोपीसोबत काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:35 IST2025-01-27T19:33:27+5:302025-01-27T19:35:43+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ल्या प्रकरणी बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे.

Big update in Saif Ali Khan attack case Woman arrested from Bengal, know what is the connection with the accused? | सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; बंगालमधून महिलेला अटक, जाणून घ्या आरोपीसोबत काय आहे कनेक्शन?

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; बंगालमधून महिलेला अटक, जाणून घ्या आरोपीसोबत काय आहे कनेक्शन?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरी काही दिवसापूर्वी हल्ला झाला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला होता. पाच दिवस त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीची चौकशी सुरू असून आज एका महिलेला बंगालमधून पोलिसांनी अटक केली. 

महाकुंभहून परतले, अयोध्येला पोहोचले...! दोन दिवसांत २५ लाख भाविक; रस्तेच बंद केले

मुंबई पोलिसांनी बंगालच्या नादिया जिल्ह्यात शोध मोहीम राबवली आणि एका महिलेला अटक केली. हल्ल्यासाठी मुंबईत अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड या महिलेच्या नावावर नोंदणीकृत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. 

मुंबई पोलिसांचे दोन सदस्यांचे पथक रविवारी बंगालमध्ये पोहोचले आणि सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यातील छपरा येथील एका महिलेला अटक केली. या महिलेचे नाव खुखुमोनी जहांगीर शेख आहे आणि ती महिला अटक केलेल्या बांगलादेशी शरीफुल फकीरची ओळखीची आहे.

महिला आरोपीच्या ओळखीची

फकीर सिलीगुडीजवळील भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि तो या महिलेच्या संपर्कात आला होता. ही महिला बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अंदुलिया येथील रहिवासी आहे. सोमवारी पोलिसांनी त्या महिलेला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला घेऊन आले आहेत.

सैफ अली खान याच्या बांद्रा येथील निवासस्थानी १६ जानेवारी रोजी हल्ला झाला. सैफ अलीवर लीलावती रुग्णालयात पाच दिवस उपचार झाले. २१ जानेवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. चाकूचा घाव सैफच्या मणक्याजवळ होता. चाकू त्याच्या पाठीच्या मणक्यापासून फक्त २ मिमी अंतरावर होता. सैफची प्रकृती आता सुधारत आहे. त्याला आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हल्ला १६ जानेवारी रोजी रात्री उशीरा झाला. यानंतर रात्रीच एका रिक्षाचालकाने सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात दाखल केले. सैफवर हल्लेखोराने चाकुने सहावेळा हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असून आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.  
 

Web Title: Big update in Saif Ali Khan attack case Woman arrested from Bengal, know what is the connection with the accused?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.