मोठी दुर्घटना टळली! सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला लोकल धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:18 IST2019-08-30T16:18:05+5:302019-08-30T16:18:56+5:30

आज दुपारी २.३५ वाजताच्यादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बफरला लोकल धडकली

Big Tragedy Avoided! local train dashed to Buffer at CSMT Railway Station | मोठी दुर्घटना टळली! सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला लोकल धडकली

मोठी दुर्घटना टळली! सीएसएमटी रेल्वे स्थानकात बफरला लोकल धडकली

ठळक मुद्देया अपघातात अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.एप्रिल महिन्यात देखील अशीच घटना घडली होती.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना टळली आहे. आज दुपारी २.३५ वाजताच्यादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बफरला लोकल धडकली असून या अपघातात अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.एप्रिल महिन्यात देखील अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे मोटरमनला नोकरीवरून निलंबित करण्यात आले होते. नंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.        

एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात हार्बर मार्गावर लोकल बफरला धडकली होती. ही दुर्घटना  फलाट क्रमांक १ वर सकाळी ११ च्या सुमारास घडली. यात मोठी हानी झाली नसली तरी फलाट क्रमांक १ वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. 

Web Title: Big Tragedy Avoided! local train dashed to Buffer at CSMT Railway Station