लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभाप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्यासाठी त्यांना 'मातोश्री'वर भेटीसाठी बोलाविले, पण त्यांनी ठाकरे यांची भेट घेणे टाळले.
दरम्यान, त्या आता भाजपच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तेजस्वी या माजी आमदार विनोद घोसळकर यांच्या सून असून, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. २०२४ मध्ये अभिषेक यांच्यावर मॉरीस नरोन्हाने फेसबुक लाइव्ह करत गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. २०१७ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा पराभव करत, तेजस्वी पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.