गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:18 IST2025-06-09T18:13:56+5:302025-06-09T18:18:44+5:30

पीओपी गणेश मूर्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला.

Big relief for Ganesh Mandals Ban on POP Ganesh idols lifted, High Court decision | गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यातील गणेश मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली आहे. मूर्ती बनवणे आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. पण,  या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे.

या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. मागील काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी होती. ती बंदी आता उठवण्यात आली आहे. 

२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...

यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. 

कोणत्याही परिस्थीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.  

'पीओपी मूर्ती तयार करता येतील. परंतु नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करता येणार नाहीत. सीपीसीबी समितीने असे म्हटले आहे की, अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यात विसर्जित केल्या जाऊ शकतात', अशी शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ समितीने  केली.

Web Title: Big relief for Ganesh Mandals Ban on POP Ganesh idols lifted, High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.