मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:08 IST2025-11-14T17:07:03+5:302025-11-14T17:08:41+5:30
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एक संशयित बॅग सापडली आहे. पोलिसांनी या बॅगेची तपासणी सुरू केली आहे.

मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
मुंबईतील सीएसएमटी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर एक बॅग सापडली आहे. या बॅगेची पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरील कठड्याजवळ लाल रंगाची बॅग दिसली. बराच वेळ ही बॅग तिथेच होती. यामुळे अनेकांना त्या बॅगेवर संशय आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच वेळेपासून सीएसएमटी स्थानकाबाहेर एक लाल रंगाची बॅग दिसत होती. या बॅगेवर अनेकांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी या बॅगेची तपासणी सुरु केली आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील गर्दी पोलिसांनी बाजूला केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील बस डेपो येथे एक संदिग्ध बॅग मिळाल्याने घबराटीचे वातावरण पसरले होते बॉम्ब शोधनाशक पथक घटनास्थळी आले आहेत.