मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:09 IST2025-01-21T09:09:08+5:302025-01-21T09:09:49+5:30
रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
Mumbai Western Line Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसंच गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू असून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याचा गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कामाच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चाकरमान्यांना काही काळासाठी मनस्ताप सहन करावा लागू शकतो.