बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 10:24 PM2020-07-12T22:24:53+5:302020-07-12T22:28:56+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

Big B and Abhishek will stay in the hospital, Amitabh's special tweet for fans | बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट

बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट

Next
ठळक मुद्दे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अभिषेक यांनी काही वेळापूर्वी ट्विट करुन, मी आणि अमिताभ बच्चन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयातच राहणार असल्याचे सांगितले.

मुंबई - महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालय हद्दीतील जुहू भागात निवासस्थान असलेले, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरुन स्वतः जाहीर केली. त्यानंतर, ते राहात असलेल्या भागातील त्यांचे चारही बंगले आज महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित केले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्या चाहत्यांनी आपुलकी व्यक्त केली. तसेच, गेट वेल सुन असे मेसेजही व्हायरल झाले. त्यानंतर, अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट केलं आहे. 

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे जाहीर केले आहे.
अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर  ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची  कोरोना चाचणी झाली होती. अमिताभ यांना कोरोना लागण झाल्याचे कळताच, देशभरातील चाहत्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली. सोशल मीडियातून आणि प्रत्यक्षही बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना करण्यात आली. त्याबद्दल अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

अभिषेक यांनी काही वेळापूर्वी ट्विट करुन, मी आणि अमिताभ बच्चन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयातच राहणार असल्याचे सांगितले. तसेच, ऐश्वर्या आणि आराध्या या घरी राहणार असून घरीच त्यांच्यावर क्वारंटाईन होऊन उपचार होतील, असे अभिषेकने सांगितले होते. बीएमसीचे त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष असणार असून त्यांच्या प्रकृतीचे अपडेटही बीएमसी घेईल, असेही अभिषेक यांनी चाहत्यांच्या माहितीसाठी सांगितले होते. 

आता, बिग बी अमिताभ यांनी ट्विट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल, बच्चन कटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे मनापासून आभार, असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big B and Abhishek will stay in the hospital, Amitabh's special tweet for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app