Mumbai: टॅक्सीचा चक्काचूर! लोअर परळमध्ये थरकाप उडवणारा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:48 IST2025-03-29T15:46:55+5:302025-03-29T15:48:31+5:30
Mumbai Car Accident: लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

Mumbai: टॅक्सीचा चक्काचूर! लोअर परळमध्ये थरकाप उडवणारा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील कारने टॅक्सीला समोरुन धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यात टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूक झाला आहे. टॅक्सीतील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील चौकशी सुरू आहे.
अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. त्यात वाहनांचा वेग जास्त असल्यानं अपघाताची तीव्रता वाढली असावी असं सांगितलं जात आहे. अपघाताची भीषणता अंगावर काटा आणणारी आहे. ज्या परिसरात हा अपघात घडला तिथं आजूबाजूला अनेक बड्या कंपन्यांची कार्यालयं आहेत. लाखो कर्मचारी या ठिकाणी कामासाठी येत असतात. पण आज शनिवार असल्यानं नेहमीपेक्षा वर्दळ कमी होती आणि रस्ताही तसा मोकळा होता. याच मोकळ्या रस्त्यावरुन वेगात वाहन दामटवण्याची खुमखूमी महागात पडल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
अपघाताच्या घटनेनंतरचा व्हिडिओ-
घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं हे पाहण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासलं जाणार असल्याचं समजत आहे. त्यातून अपघाताची नेमकी माहिती समोर येऊ शकेल.