भुजबळ, वडेट्टीवारांचे राजीनामे घ्या; मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 00:37 IST2020-12-30T00:37:05+5:302020-12-30T00:37:18+5:30
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली.

भुजबळ, वडेट्टीवारांचे राजीनामे घ्या; मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मोर्चे, आंदोलने झाली. शासन स्तरावरही यासाठी प्रयत्न सुरू असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आपली बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकारचे वकील कमी पडत आहेत. यासाठी राज्यपालांनी पुढाकार घेऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची विधाने भडकावू असून, दोन्ही समाजांत संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या मागणीचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले..