Join us  

Bharat Bandh : आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात काही काळ मेट्रो रोखली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:45 AM

विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला ही बसला.

मुंबई - विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला ही बसला. सोमवारी (10 सप्टेंबर) सकाळी 9.45 च्या सुमारास 10 ते 12 आंदोलकांनी मेट्रोचे रितसर तिकीट घेतलं. त्यानंतर आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात शिरून 15 मिनिटे मेट्रो रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र मुंबई मेट्रो वन सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तातडीने दाखल झाल्याने त्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळात सुमारे 15 ते 20 मिनिटे मेट्रो रेल्वे सेवा ठप्प झाली. परिणामी इतर मेट्रो स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. घाटकोपर ते वर्सोवा हे सुमारे 22 मिनिटांचे आंतर कापायला तब्बल 1 तास मेट्रोला लागला अशी माहिती मेट्रोच्या काही प्रवाशांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :भारत बंदमेट्रोमनसे