Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाभीजी घर पर है?... महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे लालुपुत्र तेज प्रताप Troll

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 15:17 IST

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महिला ...

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देणं, त्यांना अंलगट आलं आहे. कारण, ट्विटर युजर्संने तेज प्रताप यांना ट्रोल करत अगोदर कुटुंबातील महिलांना सन्मान द्या, असे म्हटले आहे. 

तेज प्रताप यादव यांनी लग्नाला 6 महिने होण्यापूर्वीच पत्नी ऐश्वर्या यांच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. तरीही, ऐश्वर्या यांनी सासरीच राहणे पसंत केले. मात्र, सासू राबडी देवी यांनी छळ सुरू केल्याचा आरोप ऐश्वर्या यांनी केला होता. त्यानंतर, ऐश्वर्या यांनी पतीचे घर सोडून दिले. सध्या त्या आपल्या माहेरी राहतात. मात्र, आज महिला दिनानिमित्त तेज प्रताप यादव यांनी देशातील सर्वच महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी, नेटीझन्सने तेज प्रताप यांचाच समाचार घेतला. अगोदर, ऐश्वर्या वहिनींना शुभेच्छा दिल्या का? असे म्हणत तेज प्रताप यांना ट्रोल करण्यात आले. 

तेज प्रताप यांच्या या ट्विटवर युजर्संकडून त्यांची चांगलीच धुलाई करण्यात येत आहे. ऐश्‍वर्या भाभी कैसी हैं? उन्‍हें भी दें बधाईमहिला को घर में पीटने वाले मना रहे महिला दिवसपहले अपनी पत्‍नी को दो सम्‍मानऐश्‍वर्या के चरण पकड़ माफी मांगो, सारे पाप धुल जाएंगे ? असे म्हणत नेटीझन्सने तेज प्रताप यांना ट्रोल केले आहे. 

 

टॅग्स :तेज प्रताप यादवलग्नमहिलाट्विटर