इंधनाचा जास्त साठा कराल तर खबरदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:34 AM2020-12-18T01:34:29+5:302020-12-18T01:34:33+5:30

विद्युत भट्टींवर महापालिकेची करडी नजर

Beware if you stockpile too much fuel! | इंधनाचा जास्त साठा कराल तर खबरदार !

इंधनाचा जास्त साठा कराल तर खबरदार !

Next

- सचिन लुंगसे

मुंबई :  कोळसा, लाकूड, रॉकेल किंवा डिझेल यासारख्या इंधनांवर चालणाऱ्या भट्टीसाठी जेवढ्या प्रमाणात इंधनाचा साठा करण्याची परवानगी असेल तेवढ्याच प्रमाणात साठा करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिक साठा असल्यास त्यावर महापालिकेची करडी नजर असून अशांवर जप्ती तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोळशाचा साठा धातूच्या, झाकण असलेल्या डब्यात करणे आवश्यक आहे. विद्युत भट्टीच्या बाबतीत विद्युत जोडणी ही आवश्यक तेवढ्याच क्षमतेची असणे बंधनकारक आहे. अनेकवेळा नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढते, असे पालिकेने सूचित केले.
कोळसा, लाकूड, रॉकेल, डिझेल किंवा इलेक्ट्रिक भट्टीसाठी ज्या नियम व अटींच्या आधारे परवानगी दिली असेल त्यांचे कोटेकोर पालन करणे गरजेचे आहे. भट्टीची परवानगी देताना सामान्यपणे एका ठिकाणी एकाच प्रकारच्या इंधनाचा वापर करण्याची परवानगी असते. तथापि, काही वैशिष्ट्यपूर्ण गरजांनुसार एकापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनाचा वापर करण्याची परवानगी असल्यास त्याबाबत संबंधित अटींचे काटेकोर व जबाबदारीने पालन करणे बंधनकारक आहे. 
विविध ज्वालाग्राही पदार्थांचा तसेच इतर सामानाचाही साठा दिलेल्या मार्यादेतच व नियमांनुसार करणे, भट्टीच्या जवळपास इलेक्ट्रिक वायरिंग, फिटिंग नसेल याची काळजी घेणे, लाकूड व कोळसा भट्टीचा वापर झाल्यानंतर त्यावर पाणी टाकून निखारे पूर्णपणे विझविणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा याकडे कानाडोळा केला जातो.     

...तर तातडीने अग्निशमन दलास बाेलवा
रॉकेल, डिझेल भट्टीपर्यंत वाहून नेणाऱ्या पाइपची, विद्युत पंपाच्या विद्युत जोडणीची व संबंधित बाबींची अधिकृत तंत्रज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करावी. विद्युत भट्टीबाबत सर्व विद्युत खटके, वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी वीज दाब क्षमतेला अनुरुप व आय.एस.आय. प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करुन घ्यावी. आगीची दुर्घटना घडल्यास तातडीने मुंबई अग्निशमन दलास बाेलवा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Web Title: Beware if you stockpile too much fuel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.