सावधान! ७३ टक्के मुंबईकरांना साखर अतिसेवनाचे भानच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:18 IST2025-11-14T12:18:16+5:302025-11-14T12:18:42+5:30
पालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ - साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेनाच्या दुष्पपरिणामाची माहिती नाही.

सावधान! ७३ टक्के मुंबईकरांना साखर अतिसेवनाचे भानच नाही
मुंबई - पालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ - साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेनाच्या दुष्पपरिणामाची माहिती नाही. व्यायामाचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियान’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.
१४ नोव्हेंबर २०२५ जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हेल्दी कॅम्पस उपक्रम हा मीठ-साखर अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये हेल्दी खा, स्वस्थ आहा, मस्त राहा या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येईल.
नागरिकांसाठी सुविधा
पालिकेच्या दवाखाना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये १ लाख २० हजार रुग्ण मधुमेह आजारावर उपचार घेत आहेत.
२६ रुग्णालयांमध्ये विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. यात ३० वर्षांवरील व्यक्तींचे मधुमेह आणि रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले जाते. ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत ५ लाख ५९ हजार ७५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
आहारविषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यात सुरू आहे. त्यामध्ये आजवर १.५९ लक्षहून अधिक मधुमेही रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे.