चार मार्गांवर आठवड्यातील सातही दिवस धावणार बेस्टच्या वातानुकूलित बस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 08:28 AM2021-01-19T08:28:14+5:302021-01-19T08:30:02+5:30

बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बसमार्गावर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस चालविण्यात येतील.

BEST's air-conditioned buses on four routes, | चार मार्गांवर आठवड्यातील सातही दिवस धावणार बेस्टच्या वातानुकूलित बस

चार मार्गांवर आठवड्यातील सातही दिवस धावणार बेस्टच्या वातानुकूलित बस

googlenewsNext

मुंबई :बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित बसगाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने काही जुन्या बसमार्गांवर वातानुकूलित बसगाड्या सुरू केल्या आहेत. सोमवारपासून शहर विभागातील १०६, १३४, १३७ व १३८ या चार बसमार्गांवर बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित मिनी बसगाड्या सुरू केल्या आहेत.

बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बसमार्गावर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस चालविण्यात येतील. नेव्हीनगर ते अहिल्याबाई होळकर चौक चर्चगेटदरम्यान बस क्रमांक ए १३७ या बसमार्गावर ८ ते १० मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस धावणार आहेत.

बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ए १३८ या बसमार्गावर सात ते १४ मिनिटांच्या अंतराने सात वातानुकूलित बसगाड्या धावतील. या मिनी वातानुकूलित बसगाड्या ठेकेदारांमार्फत चालवण्यात येत असल्यामुळे या बसगाड्यांवर बसचालक ठेकेदाराचा व वाहक हा बेस्ट उपक्रमाचा असणार आहे. या बस आठवड्यातील सातही दिवस चालविण्यात येणार आहेत.
 

Web Title: BEST's air-conditioned buses on four routes,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.