'Best's 165 employees die in the year | वर्षभरात १६५ ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अवेळी वेतन, १२-१३ तास कामाच्या ताणाचा परिणाम

वर्षभरात १६५ ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अवेळी वेतन, १२-१३ तास कामाच्या ताणाचा परिणाम

मुंबई : आर्थिक संकटाचे परिणाम बेस्ट उपक्रमावरच नव्हेतर, कर्मचाऱ्यांवरही होऊ लागले आहेत. अवेळी मिळणारे वेतन, रोष्टर पद्धतींच्या ड्युटीमुळे अनेक कर्मचा-यांना १२-१३ तास काम करावे लागते. या तणावाचा परिणाम त्यांच्या कामावर होत असून गेल्या वर्षभरात १६५ कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

दिंडोशी बस आगारातील बसचालक बाबारामू आलदर यांना १४ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटका आला. मात्र त्या परिसरात पालिका व शासकीय रुग्णालय नसल्याने खाजगी रुग्णालयात न नेता अलदर यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेले. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते, असे मत व्यक्त करीत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाला असल्याची नाराजी काँग्रेसचे सदस्य भूषण पाटील यांनी बेस्ट समितीमध्ये व्यक्त केली.
प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांनी मांडलेल्या सभा तहकुबीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. अखेर सर्वानुमते सभा तहकूब करण्यात आली.

सेवानिवृत्त कामगारांना त्यांची ग्रॅच्युईटी तत्काळ मिळत नाही. त्यामुळे सेवनिवृत्त होणा-या कर्मचा-यांना आपली देणी लवकर मिळतील का? याची चिंता असते. काही दिवसांपूर्वी चर्चगेट येथे एका चालकाच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला बस लावली व खाली उतरला. एका पादचाºयाने रुग्णवाहिका मागवली व त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले म्हणून त्या चालकाचा जीव वाचला. या सर्व घटना तणावामुळे होत असल्याने प्रशासन अशा प्रकारांना जबाबदार आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

मृत्युमुखी पडलेले दिंडोशी बस आगाराचे चालक आलदर यांच्या वारसाला १५ दिवसांत बेस्ट सेवेत सामावून घेण्याचे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिले.

पतपेढीतून एक लाख रुपये देण्यात येतात
सन २०१८-१९ या वर्षांत १६५ कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना कर्मचाºयांच्या पतपेढीतून एक लाख रुपये देण्यात येतात. तेथून ही आकडेवारी मिळाली असल्याचे बेस्ट समिती सदस्यांनी निदर्शनास आणले.
या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले. कर्मचाºयांच्या फिटनेसबाबत नेहमीच काळजी घेतली जाते. कर्मचाºयांचे समुपदेशन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: 'Best's 165 employees die in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.