BEST workers union calls for bus strike on October 9 | विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरला संपावर

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरला संपावर

मुंबई: बेस्ट कर्मचारी विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबरला त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. याबद्दलची नोटीस बेस्ट वर्कर्स युनियनकडून बेस्ट प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबरला मुंबईकरांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

बेस्ट वर्कर्स युनियननं दिलेल्या मागणीपत्रानुसार बेस्ट प्रशासनानं युनियनसोबत वाटाघाटी करुन अंतिम करार करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत युनियनसोबत अंतिम करार होत नाही, तोपर्यंत बेस्टच्या कर्मचाऱ्यांना महिना १० हजार रुपयांची अंतरिम वाढ देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. याशिवाय बेस्ट उपक्रमासंबंधीचा 'क' अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलिन करण्याबद्दल बेस्ट समिती आणि मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या ठरावांची तातडीनं अंमलबजावणी करावी, हीदेखील मागणी बेस्ट युनियननं केली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आणखी मागण्या-
- २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीसाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या रकमे इतकंच सानुग्रह अनुदान/दिवाळी बोनस देण्यात यावा.
- अनुकंपा भरती तातडीनं सुरू करावी.
- ११ जून २०१९ रोजी मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाचा ताफा ३३३७ करण्यासाठी तातडीनं बेस्ट उपक्रमाच्या स्वत:च्या मालकीच्या बस गाड्या विकत घेण्यात याव्यात.
- बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीवर असलेल्या पदसंख्येप्रमाणे रिक्त जागा तातडीनं भराव्यात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BEST workers union calls for bus strike on October 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.