Join us  

... म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरावालांकडून रोहित पवारांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 7:51 PM

आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारचं स्कुल मॉडेल आत्मसात करत आहोत

नवी दिल्ली - कर्जत जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांचे ट्विट रिट्विट करत केजरीवाल यांनी केवळ शिक्षणातच आपल्या देशातील विकासाचे अन् बदलाचे सर्वात सामर्थ्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. रोहित पवार यांनी केजरीवाल यांच्या ट्विटला रिट्विट करत मी माझ्यापरीने प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. 

रोहित पवार यांनी दिल्लीतील भेटीचा एका फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, केजरीवाल सरकारने दिल्लीतील सरकारी शाळांचे बदलले मॉडेल रोहित यांना चांगलेच आवडले आहे. त्यावेळी, शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह शाळेतील मुलांसमवेत रोहित यांनी सेल्फी काढला. तसेच, विद्यार्थ्यांसमेवत वेळही घालवला होता. रोहित यांनी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील शाळांना भेट देऊन येथील स्कूल मॉडेलचा कौतुक केलं होतं. त्यानंतर, आज पुन्हा दिल्लीतील शाळा भेटीचे फोटो रोहित यांनी शेअर केले आहेत. 

आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारचं स्कुल मॉडेल आत्मसात करत आहोत. मी दिल्लीतील शाळा पाहून प्रभावित झालो होतो, आता महाविकास आघाडी सरकारने शिक्षण मॉडेल बदलाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल, रोहित यांनी हेच महाराष्ट्राचं स्पीरिट असल्याचं म्हटलंय. तसेच माझ्या मतदारसंघातही मी लवकरच दिल्लीतील शाळांप्रमाणे स्कुल मॉडेल राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहित यांनी म्हटले आहे. रोहित यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनी शेअर करत रोहित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्यांनी एकमेकांपासून काहीतरी शिकायला हवं, प्रेरणा घ्यायला हवी, तेव्हा भारत देश नक्कीच विकसित होईल. शिक्षण हेच बदलाचे सामर्थ्यशाली माध्यम असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलंय.  

टॅग्स :अरविंद केजरीवालरोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशाळादिल्ली