Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांना एक रुपयाने स्वस्त वीज; बेस्ट, टाटा, अदानीच्या दरात कपात; छोट्या, घरगुती ग्राहकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 05:57 IST

१ एप्रिलपासून लागू होणार कपातीचे नवे दर

मुंबई : महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच आता मुंबई शहर आणि उपनगरात विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या वीज दरात १ एप्रिलपासून कपात होणार असल्याने वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सध्या असलेल्या विजेच्या दरात प्रतियुनिट सुमारे एक रुपयाची कपात होणार आहे. त्यामुळे छोट्या आणि घरगुती ग्राहकांना दिलासा मिळेल.

बहुवार्षिक वीज दर निश्चितीअतंर्गत वीज नियामक आयोगाने मार्च २०२५मध्ये दिलेल्या आदेशानुसार, २०२६-२०२७ या नव्या आर्थिक वर्षासाठी बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही वीज कंपन्यांच्या ही वीज दरात कपात होणार आहे. दरम्यान, नव्याने लागू होणारे विजेचे दर १ एप्रिलपासून अंमलात येणार असून, मे महिन्यात येणाऱ्या बिलात ग्राहकांना दिलासा असेल.

अदानीच्या स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकाने सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर संबंधित ग्राहकाला प्रतियुनिट ५५ पैसे एवढी सवलत मिळेल.

उदाहरणार्थ ग्राहकाने २४ तास १०० युनिट वीज वापरली व यापैकी २० युनिट वीज सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत वापरली असेल तर त्याला २० युनिट विजेवर प्रतियुनिट ५५ पैसे एवढी सवलत मिळेल.

३० लाख अदानीचे एकूण ग्राहक१० लाख ग्राहकांचा तीनशे युनिटपर्यंत वीज वापर 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Residents to Get Cheaper Electricity; Rate Cut for BEST, Tata, Adani

Web Summary : Mumbai residents will see reduced electricity rates from BEST, Adani, and Tata starting April 1st. A per-unit reduction of approximately one rupee will offer relief to small and residential consumers. Adani users with smart meters receive extra discounts during off-peak hours.
टॅग्स :मुंबईअदानीबेस्टवीज