BEST Strike Live : बेस्टच्या संप मिटविण्यासाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 18:34 IST2019-01-11T08:01:12+5:302019-01-11T18:34:22+5:30
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून ...

BEST Strike Live : बेस्टच्या संप मिटविण्यासाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे. गुरुवारी (10 जानेवारी) महापौर, पालिका आयुक्त आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आणि मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवारी संपच सुरूच आहे. बेस्ट कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौरांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे कामगार संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले. या बैठकीमध्ये महापालिकेतील विलीनीकरणाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. कामगारांचे पे ग्रेडबाबत पैसे नसल्याचे कारण देत लेखी आश्वासनही दिले नाही. उद्धव ठाकरे तोडगा काढूया, असे म्हणत होते. त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही.
या संपात रिक्षा-टॅक्सी, खासगी बस सेवा आपले खिसे भरून घेत आहेत. बेस्ट उपक्रमातील 30 हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.
(मोडू पण वाकणार नाही; कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा ठिय्या)
या मागण्यांसाठी संप
1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे
LIVE
06:33 PM
बेस्टच्या संपातील मुद्द्यांवर तिकीट दरवाढीचा प्रस्ताव
बेस्टच्या संपातील मुद्द्यांवर तिकीट दरवाढीचा प्रस्ताव
टप्प्यानुसार 4 ते 23 रुपयांनी तिकीट वाढविणार - सूत्र
05:33 PM
संपाला बंदर व गोदी कामगारांचा पाठिंबा
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला बंदर व गोदी कामगारांचा पाठिंबा, बेस्ट कामगारांना न्याय देण्याची मागणी
05:14 PM
आधी संप मागे घ्या, मग तोडगा काढू; महापालिकेचा कृती समितीवर दबाव
05:07 PM
उच्च न्यायालयातही संपावर तोडगा नाही; सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली
04:16 PM
संप मिटल्याची घोषणा करण्यासाठी सरकार- पालिकेचा तगादा
- बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच
- राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची उद्या बैठक
- तोडगा निघाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, संघटनेचा इशारा
03:05 PM
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य लढ्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संपूर्ण पाठिंबा
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, बेस्टचा संप चिरडण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील - कॉ.प्रकाश रेड्डी, सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई)
02:30 PM
संप अचानक पुकारलेला नाही, संपाची आगाऊ नोटीस देण्यात आली होती - कामगार संघटनांचा दावा
02:29 PM
- कामगार संघटनेनं हायकोर्टात तडजोडीसाठी तयारी दर्शवली
- प्रशासनाकडून संप मिटवण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग
- संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी 4 वाजता मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
02:18 PM
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची चिन्हं, मुंबई हायकोर्ट दुपारी 3 वाजता देणार निर्णय
01:02 PM
बेस्ट कर्मचारी मागण्यांवर ठाम
12:27 PM
मुंबई : बेस्ट संदर्भातील याचिका तासभरासाठी तहकूब, सरकारला मध्यस्थी करुन संप मिटवण्याचे कोर्टाचे आदेश. कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश.
12:07 PM
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा
11:57 AM
बेस्ट संपाविरोधात अॅड.दत्ता माने यांची हायकोर्टात याचिका, संप बेकायदेशीर असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप, कोर्टात सुनावणीला सुरुवात.
11:12 AM
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर आज पुन्हा बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजाॅय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि कृती समितीची दुपारी 2 वाजता बैठक
11:11 AM
As BEST strike enters 4th day, we are committed to serve our esteemed commuters with additional services. We expect slightly longer queues than usual at Ghatkopar & Andheri. We are grateful for your patience and kind cooperation, as always.
— Mumbai Metro (@MumMetro) January 11, 2019
08:05 AM
बेस्ट संपाचा चौथा दिवस : एकही बस आगाराबाहेर पडलेली नाही. पहाटे 5 वाजताच्या शिफ्टला एकही वाहन चालक अथवा कंडक्टर कामावर रूजू झाले नाहीत.