‘बेस्ट’च्या ड्रायव्हरची होणार ‘सरप्राइज टेस्ट’; महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:10 IST2024-12-13T07:10:28+5:302024-12-13T07:10:35+5:30

मागील ४ दिवसांपासून मुंबईत बेस्ट उपक्रमातील बसेसकडून होणाऱ्या गैर व्यवस्थापन आणि चालकांकडून होणारा निष्काळजीपणा समोर येत आहे. यातच गेल्या दोन दिवसांत भाडेतत्त्वावरील काही बस ड्रायव्हर ऑनड्यूटी दारू खरेदी करीत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

'Best' drivers to undergo 'surprise test'; General Manager instructs contractors | ‘बेस्ट’च्या ड्रायव्हरची होणार ‘सरप्राइज टेस्ट’; महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश

‘बेस्ट’च्या ड्रायव्हरची होणार ‘सरप्राइज टेस्ट’; महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : भाडेतत्त्वावरील बसच्या ड्रायव्हरकडून ऑनड्युटी दारू खरेदीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत बेस्ट प्रशासनाकडून ब्रिथ ॲनालायझर टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती  ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिली.

मागील ४ दिवसांपासून मुंबईत बेस्ट उपक्रमातील बसेसकडून होणाऱ्या गैर व्यवस्थापन आणि चालकांकडून होणारा निष्काळजीपणा समोर येत आहे. यातच गेल्या दोन दिवसांत भाडेतत्त्वावरील काही बस ड्रायव्हर ऑनड्यूटी दारू खरेदी करीत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजीची असून मुलुंड बस डेपो येथील गाडीचे ड्रायव्हर संतोष बारस्कर यांना खात्यातून निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे प्रवाशांच्या भीतीमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे आता बस ड्रायव्हरची ‘सरप्राईज ब्रिथ ॲनालायझर’ टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

अशी होणार कार्यवाही
nबेस्टच्या स्वमालकीच्या बसवर असलेल्या ड्रायव्हरची अशाप्रकारे ब्रिथ अनालायझर टेस्ट आधीपासूनच करण्यात येत आहे. 
nतर आता भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरची ब्रिथ ॲनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे. 
nयामध्ये आगारातून बस प्रवासासाठी निघताना किंवा कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल. यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात येईल.

Web Title: 'Best' drivers to undergo 'surprise test'; General Manager instructs contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट