Best driver heart attack; The bus lost control and hit the signal | चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; नियंत्रण सुटल्याने बेस्ट बस सिग्नला धडकली

चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; नियंत्रण सुटल्याने बेस्ट बस सिग्नला धडकली

मुंबई - चेंबूर येथे बेस्ट बसचा मोठा अपघात टळला आहे. चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील ताबा सुटला व बस फुटपाथवरील भाजीच्या दुकान घुसली, चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे ही दुर्घटना घडली. बस चालक हरिदास पाटील यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. 

प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार बस मार्ग क्रमांक ३८१ ही बस घाटकोपर आगार ते टाटा पॉवर हाऊस, चेंबूरकडे जात असताना सकाळी ११.१० वा. बसंत पार्क सिग्नल येथे बस आली असता बस चालक  क्र. ९१२८५ , श्री. हरिदास पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला व ती बस बसंत पार्कच्या सिग्नलला धडकली. त्या बसमध्ये एकूण ९ प्रवाशी होते , त्यापैकी एकजण पोलिस होता. त्यांनी पोलिसांची गाडी मागून त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. प्रवाशांमध्ये कोणालाही इजा झाली नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Best driver heart attack; The bus lost control and hit the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.