मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:48 IST2025-01-18T11:47:50+5:302025-01-18T11:48:08+5:30

मुंबई सेंट्रल आगारातील बंद दुपारी २ च्या सुमारास मागे घेण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली.

BEST contract employees protest at Mumbai Central | मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

मुंबई : पगार वेळेत न झाल्याने बेस्टच्या विविध आगारांमध्ये कंत्राटी बसवाहक आणि चालक मागील काही दिवसांपासून संप करत आहेत. मुंबई सेंट्रल आगारात शुक्रवारी ओलेक्ट्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून आंदोलन केले. त्यामुळे या आगारातील ६० बस गाड्या बाहेर न पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुंबई सेंट्रल आगारातील बंद दुपारी २ च्या सुमारास मागे घेण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली. मात्र, या कंत्राटी बस आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर बेस्टचे नियंत्रण का नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आर्थिक गणित बिघडल्याने ‘बेस्ट’ने स्वमालकीच्या बसऐवजी कंत्राटी बस घेण्याचा सपाटा लावला आहे. 

Web Title: BEST contract employees protest at Mumbai Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.