स्वतंत्र मार्गिकेवरून धावणार ‘बेस्ट’, वाहतूककोंडीवर प्रवास होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:34 AM2019-06-23T04:34:12+5:302019-06-23T04:34:24+5:30

नवीन बसगाड्यांसाठी महापालिकेकडून अनुदान मिळाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास सुसाट करण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे प्रयत्न सुरू आहेत.

 'Best' Bus to run on a separate Road | स्वतंत्र मार्गिकेवरून धावणार ‘बेस्ट’, वाहतूककोंडीवर प्रवास होणार सुलभ

स्वतंत्र मार्गिकेवरून धावणार ‘बेस्ट’, वाहतूककोंडीवर प्रवास होणार सुलभ

googlenewsNext

मुंबई  - नवीन बसगाड्यांसाठी महापालिकेकडून अनुदान मिळाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास सुसाट करण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेकरिता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भायखळा आणि सायन या मार्गांवर हा प्रयोग केला जाणार आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच यावर अंमल होईल, असे संकेत बेस्ट प्रशासनाने दिले आहेत.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनाने सहाशे कोटी रुपये अनुदान जाहीर केले आहे. यापैकी दोनशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत़ भाडेतत्त्वावर बसगाड्या घेणे, भाडेकपात न केल्यास उर्वरित रक्कम थांबविण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. मात्र, बसगाड्यांची संख्या आणि त्यांच्या फेऱ्या वाढविल्या, तरी मुंबईत मोठ्या प्रमाणात होणाºया वाहतूककोंडीचा फटका या बसगाड्यांना बसेल. त्यामुळे बºयाच काळापासून स्वतंत्र मार्गिकेसाठी बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यावर अंमल होईल, असे संकेत बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीच्या बैठकीत नुकतेच दिले.
यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा सुरू असून, असे काही मार्ग शोधून काढण्यात आले आहेत. बसगाड्यांचे प्रमाण अधिक असलेल्या बसमार्गांवर जेथे दर दोन-तीन मिनिटांनी बस जाते, अशा मार्गांवरचे हा प्रयोग केला जाणार आहे. भायखळा आणि सायन या मार्गावर दीडशे बसगाड्या विविध ठिकाणी जातात. त्यामुळे या मार्गांची निवड करण्यात आली आहे, तसेच वाशी-चेंबूर आणि सायन-मुलुंड या मार्गांचाही विचार सुरू आहे. मात्र, यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुल आणि वरळी ते हाजी अली या मार्गावरील हा प्रयोग कमी बसगाड्या आणि वाहतूककोंडीमुळे बंद पडला आहे.

भायखळा-सायन मार्गावर १२५ ते १५० बसगाड्या धावतात. प्रत्येक दोन ते तीन मिनिटांनी येथे बसगाड्यांच्या फेºया आहेत.
घाटकोपर, अंधेरी, जुहू आणि ओशिवरा येथील धोकादायक पूल बंद केल्यामुळे बेस्टचे काही बस मार्ग वळविण्यात आले आहेत.
बस मार्ग वळविल्यामुळे प्रत्येक बस आगारामागे बेस्ट उपक्रमाला सहा ते सात लाख रुपए नुकसान होते.

Web Title:  'Best' Bus to run on a separate Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.