Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 22:37 IST2024-12-09T22:36:46+5:302024-12-09T22:37:01+5:30

Best Bus Accident :जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

best bus accident, speedy bus enters in market lbs road in kurla, mumbai | Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबई : मुंबईतील  कुर्ल्यामध्ये बेस्ट बसच्या भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर बेस्टच्या बसने अनेक जणांना धडक दिली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी कुर्ला येथील अंजुम - ए - इस्लाम शाळेसमोर बेस्टच्या बसचा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे चालकाचे म्हणणे आहे. यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण  गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुर्ला एल वॉर्डातील या वर्दळीच्या रस्त्यावर बेस्ट बस चालकाकडून वाहनांना धडक देण्यात आली असून त्यात एका रिक्षाचा ही चक्काचूर झाले असल्याचे समोर आले आहे. 

या घटनेतील जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींच्या प्रकृतीची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान,  बेस्ट बस चालक आणि घटनेप्रकरणी अद्याप बेस्ट उपक्रमाकडून कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

मृतांची नावे: 
आफरिन रसूल शाह (१९)
आझम शेख (२०)
कनिस फातिमा कादरी (५५)
शिवम काश्यप (१८)

दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे - आमदार महेश कुडाळकर
या घटनेबाबत आमदार महेश कुडाळकर म्हणाले, मी स्वत: घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचं आहे. जवळपास ३० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: best bus accident, speedy bus enters in market lbs road in kurla, mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.